कशी असणार अकरावी प्रवेशाची CET परीक्षा ? - जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट

तुम्हाला माहिती असेल, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी - दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा

11th admission criteria


तुम्हाला माहिती असेल, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी - दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज 19 जुलैपासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे - तर ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार असल्याने ही परीक्षा नक्की कशी असणार? याबबाबत विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न पडत आहेत


 कशी असणार CET परीक्षा ?


  •  शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार - ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार, या परीक्षेच्या मार्क्सवरच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे


  •  तसेच ही परीक्षा एकूण 100 मार्कांची असणार - यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत

१२ वी पुस्तके 2020 Available to Download in PDF Format. For MPSC Bharti Exam

  •  त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे - हि परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार असून या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे 


  •  त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे - तर परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे


  •  याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे शुल्क भरले त्यांच्याकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही - तसेच जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही


  •  अशा विद्यार्थ्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे - त्यांचे मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे, दरम्यान या परीक्षेविषयी आणखी काही अपडेट आले, तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू 


 अकरावी प्रवेशाची CET परीक्षा - कशी असणार हि माहिती, दहावी पास विद्यार्थ्यासाठी नक्कीच खुप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील शेअर करा 


 हि माहिती नक्की शेअर करा..!