बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ने सहभागी बँकांमध्ये लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी पदांच्या १०,२७७ जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. 'CRP CSA XV EXAM-2025' या सामाईक भरती प्रक्रियेअंतर्गत बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक तसेच पंजाब आणि सिंध बँक या बँकांमध्ये नियुक्त्या होणार आहेत. इतर जाहिरात :➡ IB Recruitment 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 जागांसाठी मेगाभरती राज्यनिहाय १०,२७७ ग्राहक सेवा सहयोगी पदांचे वाटप महाराष्ट्रात सर्वाधिक ११७० जागा उपलब्ध असून, उत्तर प्रदेशमध्ये १३१५ आणि कर्नाटकमध्येही ११७० पदे भरली जाणार आहेत. संपूर्ण राज्यनिहाय वाटप पुढीलप्रमाणे: अंदमान-निकोबार (१३), आंध्र प्रदेश (३६७), अरुणाचल प्रदेश (२२), आसाम (२०४), बिहार (३०८), चंदीगड (६३), छत्तीसगड (२१४), दादरा नगर हवेली व दीव दमण (३५), दिल्ली (४१६), गोवा (८७), गुजरात (७५३), ...